Skip to main content

Posts

लोकप्रभा मधले माझे पुस्तक परिक्षण

 
Recent posts

माझा महाराष्ट्र टाइम्स मध्ये छापून आलेला लेख

मुझको भी तो लिफ्ट करादे, थोडी सी तो लिफ्ट करादे... इतके हतबल कधी कोणी होवू नये. मला अजून ही आठवतंय, माझी लेक मला विचारायला आली होती, "आई, शाळेत क्रिकेट सुरू झालेय. मी पण भाग घेऊ का?" खेळाची भूक भागेल या गरजेवर आणि काहीतरी नवीन या कुतूहलाने मी ही आनंदाने हो म्हंटले. बहुदा सर्व पालक असाच विचार करत असावेत. तेंव्हा माझी लेक चौथ्या इयत्तेत होती आणि तिच्या सोबतच्या मुलीही बऱ्यापैकी त्याच वयोगटातील होत्या. इतक्या लहान वयात करीयरच्या दिशा ठरवणेही कठीणच असते. मग सुरू झाली शनिवार रविवार २ तास क्रिकेट प्रॅक्टीस. तेंव्हा मुलींना मुलांमध्येच प्रॅक्टीस करावी लागत असे. कारण तेवढ्या संख्येने मुली नसायच्या. पुढे या प्रवासात अनेक सोबती भेटत गेले. मुलींसारखेच पालकांचे ही ग्रुप बनत होते. फक्त मुलींना या खेळाची आवड आहे हे माहीत होते, पण पुढे काय घडेल याचा विचार कोणीही केला नव्हता. मुळात या क्षेत्रातील माहितीही आम्हा पालकांकडे फारशी नव्हती. आता हळूहळू क्रिकेटची गाडी एकएक वळण घेत, सारे चढउतार करत छोट्या छोट्या स्टेशन्सवरून पुढे जाऊ लागली. प्रायव्हेट टुर्नामेंट, अंडर १६, अंडर १९, सिनियर वुमेन्स, एमस...